माझ्या कथा

डुंगीवरली डोशी अन पोपट्या...
(माझी भाषा माझी संस्कृती)

एक आऊ अन तिचा पोश्या पोपट्या डुंगीवार तेंचे भोंगीत रहत. पोपटेचा बाहास तो बारीक होता ताहाच गमावलाता. आपले पोशेलं काही कमी नको पडाय आसा तेची आईस इचार कर अन तशे रोज लोकांचे मंजरीलं जा. पोपट्येचा बाहास त्येल बारीक होता तहा जाम दारु पेन झोड, तहा तेची आईस आता चाकरी करतं. पोपटेलं पण तेची आईस बेस वाटतच नवती. कारण ना तेची आईस एक डोळेलं आंधळी होती. साळतली पोश्या तेलं बरीच 'चकनी चकनी' करुन खिजवत, तहा तेल तेचे आयचास राग ये. आयलस तो इचार पण मग ती उगाटेच रह. तशे मग तेलं आजुन रग ये.
तेन्ही आयलस सांगून ठवेल जर का तू साळत आलीस त मी साळत जाणारच नाय. तरी ती एक दिवस मास्तरलं सांगाय आलिती का बुवा माझे पोपटेलं बेस शिकवजास त ह्या तेनी पाहिला आणि घरी येन जाम भांडला तीचेशी पण आईस उगाटेच बसली.
शेवटी मग पोपटेनिच ठरवला ज्याम अभ्यास करीन, साहेब होइन अन ईल आठच ठवून जाईन. तो गडी ज्याम हुशार होता. दरवर्षी एक नंबर काहडं. आयलस जाब देत नवता पण मग तरी आयलस वाइट नवता वाट. असाच आभ्यास करत करत मग तो नवकरीलं लागतो. तो जसा जातो तसा तिकडच रहतो लगिन पण तिकडच करतोय. आता नवकरील साहेब मग तेल बायकोसही नाका मुखालं बेस भेटते. पुढ मग तेलं दोन पोश्या होत्याय. इकड आयचास कसाक चाललाय तेचा तेलं काहीच घेणा देना नवता. आईस बिचारा मजूरी करं अन एळचे उगाटेच पडविलं जाऊन रडं. त्या आईसही बिचारा गरीबच होता. गावातली लोका ज्याम सांगत, 'मोठ्याय, कहा व पोपट्या नाय ये?' तशे मग ती लगेच सांग, 'आरे पण सुट्या नाय ना तेल, कसाक ईल तो.' असा सांग अन भोंगीत येन उगाटेच रडं. तिलही  माहित नवता आता माझा पोपट्या ईल का नाय.

एक दिवशी मंगा डवरेकडून इसऐक रूपये उसनं घेतलं अन तशे गेला त्या पोपटेखन. पोपटेचे मास्तरालं माहित होता, तो कोठं नवकरीलं आहे. मग ती मास्तरलच घेऊन गेली. सहरात आली अन मास्तरनी लांबुनच घर दाखवला, तसा तीनी सांगला, 'मास्तर मी जाइन आता.' दारापाशी गेली तसा तीलं पोपटेचे बारीके पोशेने पाहला अन पोश्या बिहला अन रडत रडत घरातच घुसला. मधून मग तेचा बाहास म्हणजे पोपट्या आला, अन तेचेच आयलस पाहून सांग, 'कोण व तु? तुझेमुळं माझा पोश्या बिहला ना! जाय आठुन.' तशी तिन्या खाल मान घातली अन बिचारी रडतच लहा लहा निघली. बिचारी एकच डोळेतुन बरीच रड. कोकडं जावा ह्या पन तीलं कळत नवता. एकुलता एक पोश्या तोय बाहचेस वानीच निगला. जाव जाव इचार कर ताव ताव रडं. तिल मनातून आसा वाट का एखादे झाडालं फास देवा अन मरून घेवा. जाव पोपट्या बारीक होता ताव तिन्या मंजरी करून वाहडवला. आता तिल पहाय कोणीच नवता मग जगून काय करावा. आता आशीय मी मतारीच झालुय. असा इचार करत करत ती येते मग तिचे घरी. एवढी रडं का तिचे डोळेलं आता आसुळा पन येत नवती. जाव जगाईल ताव रहन असा इचार करून त्या आइस म्हणजे डोशी रहं. आता तं दूसरेही डोळेखन बेस दिसत नवता.

एक दिवस डोशीची ज्यामच तब्बेत बिघडली. मास्तरनी पाहला अन पोपटेलं सांगला का एखाद दिवस एजोस डोशी बराच आजारी आहे. पन तो पोपट्या तो पोपट्या फिरून नाय पाहला तेनी. इकड डोशी पार ज्याम झालाता. मंगाबा, सुंदरीबाई, राधीची सुनस, कधिमधि जीवल्याबा ही तीलं नागलीची पेज आणून पाजत. पन डोशीनी पार आंग टाकून दिल्हाता. मग एक दिवशी लोकांशी डोली करून सरकारीत घेऊन जाव असा ठरवला, अन लोक गेलं डुंगीवार तिचे भोंगीत. तठं जान पाहातत ताव डोशी गमावलाता. डोशीची हालत पाहून लोकांचे डोळेलं बरीच आसुळा येत. जे लोकांचे मंजरीलं डोशी जाएल ना ती लोका त गहिवरुन रडत. मास्तर तठंच होता. तेलपण गहिवरुन ये. मग तेनीच पोपटेलं सांगला, 'आरे आता तरी ये आयलस खांदा दिया.' पोपटेनि पण विचार केला आता जर नाय गेलु त लोका ज्याम भांडतील. मग तो बायकोलस खोटा सांगून एकटाच गावालं येतो. डुंगीवर येतो तहा भोंगीचे तनाहुन सगळी लोका बसून रडत होती. काही बांडग गडी शेकोटी करून बशेल होत. पोपटेलं पाहताच मास्तर, जीवल्याबा अन मंगाबा ज्याम चिडलं, पन मग वेळ पाहून ऊगाटेच बसलं. तरी मास्तरलं नाय रहिवायला. तेल बाजूला घेतला, अन चांगला धरून खडसावला. 'काय रे कोणी केला तुल मोठा? आईनिस का बाहनिस? बाहास दारू पेन मेला, आईनिस तुल वाहडवला, अन आज तू तिलच इसरलास. आरे तु जहा बारिक होतास ना तहा तुझे डोळेत टोकराची काडी घूसलीती. तहा मी पैस खरचुन खाजगीत नियेल. तहा तुझा डोळा आखा कामतुन गेलाता. डाक्टर सांग दुसरा डोळा बसवाय लागल नतं व हा एक डोळेलं असाच आंधळा रहील. आईनीस पाहला अन डाक्टरल सांगत माझा डोळा बसवा पण तेल बेस करा. मग तुझे आईनिस तिचा डोळा तूल दिल्हाता माहिती आहे का? अन आज तूल तिची साधी चाकरी नाय करता आली. असा कसाक रे तू साहेब?' पोपट्या उगाटेच उभा रहून आयकं. पण जसा मास्तरनी तो डोळेचा विषय काहडला तसा पोपट्या मोठलेन रडाय लागला. सगळी लोका तेल पाहात. तेची आईस कहा एक डोळेलं आंधळी होती? ह्या तेलं आज कळला. ज्याम रडला गडी रातभर! कोंबडा आरवला अन जीवल्याबाशी तिरडीची तयारी केली. डोशीलं आंघळवला अन तिरडीवर ठवला. पोपटेनि एक खांदा अन बाकिचेंशी खांदा देऊन मनसुटीची वाट धरली. पोपट्या खाल मान घालून मुळमुळ रडत चाललाता.

शब्दांकन - दशरथ भोये (उपशिक्षक)
मोबाईल - ९५७९५२९५६१

No comments:

Post a Comment

उपक्रम

माझी शाळा सुंदर शाळा

  माझी शाळा सुंदर शाळा बघा कशी तयार केली, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाची PDF 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻