१०० मराठी सुविचार


निवडक मराठी सुविचार
१) खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.
२) विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.
३) यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.
४) आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.
५) अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.
६) मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.
७) चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.
८) जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.
९) मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.
१०) गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.
११) विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.
१२) दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
१३) खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.
१४) ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.
१५) खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.
१६) संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.
१७) निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.
१८) शहाण्याला शब्दांचा मार.
१९) तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.
२०) करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.
२१) रिकामे डोके शैतानाचे घर असते.
२२) संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.
२३) ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.
२४) मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.
२५) चकाकते ते सर्व सोन नसते.
२६) कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
२७) जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.
२८) खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.
२९) संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.
३०) कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.
३१) वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.
३२) लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.
३३) बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.
३४) सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.
३५) विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.
३६) जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.
३७) अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.
३८) एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.
३९) चरित्र हाच खरा इतिहास असतो.
४०) नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.
४१) ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.
४२) चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.
४३) चारित्र्य म्हणजे नियती.
४४) चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.
४५) दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.
४६) विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.
४७) प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते.
४८) आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.
४९) श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.
५०) मैत्री म्हणजे समानता.
५१) मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.
५२) परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.
५३) भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.
५४) सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.
५५) कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.
५६) थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.
५७) मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.
५८) महान माणसांची माने साधी असतात.
५९) जो एकांतात राहू शकतो तो खरोखरच महान असतो.
६०) मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.
६१) सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.
६२) जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.
६३) जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.
६४) स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.
६५) आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.
६६) इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.
६७) इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.
६८) जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.
६९) स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.
७०) जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.
७१) वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.
७२) कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.
७३) सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.
७४) वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.
७५) पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.
७६) द्वेष करणे सोपे असते,पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.
७७) माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.
७८) मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.
७९) ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.
८०) ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.
८१) श्रम हेच जीवन.
८२) संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.
८३) जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.
८४) जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.
८५) सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.
८६) माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.
८७) दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.
८८) द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.
८९) संयम हेच खरे औषध.
९०) पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.
९१) संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.
९२) जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.
९३) निसर्ग हाच खरा कायदा.
९४) दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.
९५) मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.
९६) नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.
९७) एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.
९८) संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.
९९) फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.
१००) या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.

No comments:

Post a Comment

उपक्रम

माझी शाळा सुंदर शाळा

  माझी शाळा सुंदर शाळा बघा कशी तयार केली, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाची PDF 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻