आज विशेष काय?

 


लिप वर्ष म्हणजे काय ?

2024  हे वर्ष लीप वर्ष असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. लीप वर्षात इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस अधिक असतो. मात्र असे का असते तुम्हाला माहिती आहे ?

प्रत्येकी चार वर्षानंतर फेब्रुवारीमध्ये 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. सोबतच वर्षाला 365 दिवसांच्या ऐवजी 366 दिवस असतात. लीप हे दर चार वर्षांनी येते. 2020 आधी हे वर्ष 2016 आणि नंतर 2024 मध्ये येणार आहे.

एक कॅलेंडरचा कालावधी हा पृथ्वीला सुर्याची परिक्रमा पुर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळे एवढा असतो. पृथ्वीला सुर्याभोवती एक फेरी पुर्ण करण्यासाठी जवळपास 365.242 दिवस लागतात. मात्र आपण दरवर्षी अतिरिक्त 0.242 वेळ मोजत नाही. याच अतिरिक्त वेळेला 4 वेळा एकत्र केले तर हा कालावधी एका दिवसा एवढा होता. त्यामुळे दर चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये 1 दिवस अधिक जोडला जातो व ते लीप वर्ष असते.

ग्रेग्रोरियन कॅलेंडरद्वारे यात सुधारण करण्यात आल्या आहेत. हे कॅलेंडर सर्वात प्रथम 1582 मध्ये सादर करण्यात आले होते. ग्रेग्रोरियनच्या आधी ज्यूलियन कॅलेंडर होते. याला ईसा पुर्व 45 मध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये लीप वर्षासाठी वेगळे कॅलेंडर असे.

ज्यूलियन कॅलेंडरमध्ये पृथ्वीला परिक्रमा पुर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे निश्चित ज्ञान नव्हते. त्यामुळे हे कॅलेंडर 10 दिवस मागे पडले होते. 16 व्या शतकात अखेर या चुकीला सुधारण्यासाठी 1582 मध्ये पॉप ग्रेगरी XIII ने थेट 4 ऑक्टोंबरनंतर 15 ऑक्टोंबर तारीख येईल, असा आदेश दिला व ही चुक सुधारली.त्यानंतर पोपने नवीन लीप वर्षाची प्रणाली आणली व त्याला ग्रेग्रोरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले.

लीप वर्ष निश्चित करण्यासाठी त्या वर्षाला 4 या संख्येने पुर्णपणे भाग जाणे गरजेचे असते. उदाहरणार्थ 2000 ला 4 ने पुर्ण भाग जातो. याच क्रमाने 2004, 2008…2020 हे लीप वर्ष ठरतात.

लीप वर्षासाठी दुसरी अट म्हणजे जर एखाद्या वर्षाला 100 ने पुर्णपणे भाग जात असेल, तर ते लीप वर्ष ठरत नाही. मात्र त्या वर्षाला 400 ने विभागले गेले तर ते लीप वर्ष ठरते. उदाहरणार्थ, 1500 या वर्षाला 100 ने विभागले जाते, मात्र 400 ने पुर्ण विभागले जात नाही. मात्र 2000 या वर्षाला 100 आणि 400 दोन्हीने विभागले जाऊ शकते. त्यामुळे याला लीप वर्ष म्हणतात.

 

१४ जानेवारी : भूगोल दिन 

१४ जानेवारी : भूगोल दिन

जाणून घ्या सविस्तर माहिती

वर्षभर आपण सर्वजण निरनिराळे दिन साजरे करतो. उदा.अपंग दिन, प्रजासत्ताक दिन, बालदिन वगैरे त्या त्या दिनाचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. त्याच धर्तीवर १९८८ पासून १४ जानेवारी हा दिवस भूगोलदिन म्हणून महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे साजरा केला जातो.

प्रा. चं. धुं. देशपांडे यांना भूगोल महर्षी म्हटले जाई. त्यांची दिल्लीपर्यंत नव्हे तर परदेशातही नावाजलेले भूगोलतज्ज्ञ म्हणून ख्याती होती. सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या झाला होता. त्यांच्या ७५ व्या जन्मदिनी असे ठरले गेले की, भूगोल या अतिशय महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन भूगोल दिन' म्हणून साजरा करायचा व २२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते. म्हणूनही १४ जानेवारी या दिवसाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. याच दोन्ही गोष्टी मनात ठेवून ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात भूगोल दिन' साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली. त्यानुसार या दिवशी भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात.
पृथ्वीवर घडणाऱ्या नैसर्गिक व भौतिक घडामोडींचा मानवाच्या संदर्भात र्सवकष विचार करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. भुगोल या विषयासंदर्भात अनेकांना माहितीच नाही,शाळेत एक विषय म्हणून त्याच्याकडे बघीतले जाते.. भूगोल या विषयासंदर्भात रूची निर्माण होण्यासाठी हा विषय रंजक पध्दतीने शिकविला गेला पाहिजे. महाविद्यालयांमध्ये सुध्दा भूगोल अध्यापन पध्दतीबाबत उदासिनता दिसून येते. त्यामुळेच दहावीनंतर हा विषय अभ्यासाला घेतला जात नाही. रॅटझेल हे जर्मन भूवैज्ञानिक हे मानवी भूगोलाची व्याखा करताना म्हणतात, मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय.

भूगोल दिनाच्या शुभेच्छा...!

संकलन – दशरथ भोये (रावजी कामडी प्राथमिक आश्रमशाळा ओझरखेड)


 


No comments:

Post a Comment

उपक्रम

माझी शाळा सुंदर शाळा

  माझी शाळा सुंदर शाळा बघा कशी तयार केली, माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाची PDF 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻